बॅकेकडे तारण ठेवलेल्या इमारतीत अनधिकृतपणे प्रवेश; सहा जणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः बॅकेकडे तारण ठेवलेल्या मालमत्तेच्या इमारतीचे मुख्य दरवाजाचे कुलप तोडून सिक्युरिटी गार्डला शिवीगाळ करुन घरात अनाधिकृतपणे प्रवेश करणाऱ्या सहाजणांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहल सुनिल साळवी (रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) त्यांची पत्नी (पुर्ण नाव माहित नाही), आणि अन्य चार अनोळखी असे संशयित आहेत. ही घटना मंगळवारी (ता. १७) सायंकाळी पाच वाजता कारवांचीवाडी, आदर्शवसाहत सदगुरु छाया, पोमेंडी बुद्रुक येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रोहन राजीव पै (वय ४३, रा. निलकमल, विलेपार्ले पूर्व-मुंबई) यांच्या बॅकेचे ग्राहक मे. परेश पार्मासिटीकल डिस्ट्रीब्यूटस या संस्थेचे भागिदारींनी गहाणदार-जमिनदार सुनिल विश्वनाथ साळवी यांनी फिर्यादी यांच्याकडे तारण ठेवलेली मालमत्ता बुधवारी (ता. ११) डिसेंबरला तहसीलदार-रत्नागिरी यांनी ताबा घेवून तो फिर्यादी रोहन पै यांच्याकडे दिला. या मालमत्तेच्या देखरेखीसाठी बॅंकेकडून नियुक्त केलेले सिक्युरिटी गार्ड आकाश त्रिलोकीनाथ मिश्रा (वय ४७) व तिलकधारी (वय ५०) हे प्रत्यक्ष मिळकतीमध्ये हजर अशताना संशयित व त्यांची पत्नी व अन्य चार जणांनी सदगुरु छाया या इमारतीचे मुख्य दरवाजाच्या कुलपास बॅंकेने लावलेले सिल व कुलूप हातोडी वसळीने तोडून व गार्ड आकाश मिश्रा व तिलकधारी यांना शिवीगाळ करुन इमारतीमध्ये प्रवेश करुन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. या प्रकरणी सुनिल साळवी यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.