
दापोलीतील प्रौढाचा मुंबईत मृत्यू
दापोली:
दापोली शहरातील फॅमिली माळ येथे राहणारे हैदर अली अब्दुल समद चिमावकर (५१) या प्रौढाचा उपचारादरम्यान मुंबई येथे मृत्यू झाल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदर अली चिमावकर हे हिना अपार्टमेंट रूम नंबर १२, फॅमिली माळ दापोली येथे रहात होते. राहत्या बिल्डिंगच्या टेरेसवरून पत्रा तुटल्याने ते खाली जमिनीवर पडून गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जालगाव येथील खासगी रुणालयात दाखल करुन पुढील उपचाराकरिता २ नोव्हेंबर रोजी केईम रुग्णालय, नवी मुंबई येथे दाखल करण्यात आले होते. येथे ‘उपचार सुरू असताना ७ नोव्हेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत दापोली पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेतः