संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी चंद्रकांत कांबळे यांची उपनिरीक्षकपदी निवड
संगमेश्वर : पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले चंद्रकांत कांबळे यांची पदोन्नतीने पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
लांजा तालुक्यातील पूनस या गावचे ते सुपुत्र असून त्यांचे वडील तुकाराम कांबळे हे पोलीस खात्यात असल्याने चंद्रकांत कांबळे यांनीही स्वतः खाकी वर्दीतील पोलीस होण्याची खूणगाठच बांधली होती. ते पोलीस होण्याचे स्वप्न रंगवू लागले होते. म्हणतात ना जिद्द आणि चिकाटी असेल तर नक्कीच यश हे त्याच्या पायाशी लोटांगण घालते त्या प्रमाणे त्यांच्या जिद्दीला अखेर सन 1992 साली यश आलेच. त्यामुळे त्यांनी पाहिलेले स्वप्न हे सत्यात उतरले.
20 मे 1992 साली त्यांची पोलीस दलात भरती झाली. सुरुवातीला जिल्हा मुख्यालय येथे रुजू झाले. काही वर्षे तेथे सेवा केल्यानंतर तेथून शहर पोलीस ठाणे, देवरुख पोलीस ठाणे, साखरपा पोलीस दूरक्षेत्र, खेड पोलीस ठाणे, संगमेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या डिंगणी पोलीस दूरक्षेत्रात पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल तर सध्या ते संगमेश्वर पोलीस ठाण्यात तीन वर्ष सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असा त्यांचा प्रवास सुरु राहिला असून 33 वर्षीय पोलीस सेवा कारकिर्दीत ते ”आधी खाकी,मग बाकी” या उक्ती प्रमाणे कोणचाही मुलाहिजा न बाळगता इमानेइतबारे कर्तव्यदक्षपणे यशस्वी सेवा बजावत आहेत. श्री चंद्रकांत कांबळे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सेवा बजावताना त्यांनी वरिष्ठठांच्या मार्गदर्शखाली विवि गुन्हयांचा तपास करून काही आरोपींना जेरबंदही केल्याची यशस्वी कामगिरी केली आहे . तर सर्व सामान्याच्या तक्रारी सोडवून गौरगरीबांना हक्काचा योग्य तो न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुद्धा त्यांनी केला आहे.33 वर्षीय पोलीस सेवा कार्यकाळात त्यांनी कर्तव्याशी प्रामाणिक राहून अनेक गुन्ह्यांची उकल केली असतानाच अनेक उल्लेखनीय कामे केली असून सध्या संगमेश्वर पोलीस ठाण्यात सेवा बजावत असून त्यांच्या कार्याची दाखल महाराष्ट्र पोलिस प्रशासनाने घेत नुकतेच त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी बढती बहाल केली असून संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या शुभहस्ते पदोन्नतीचा सन्मान प्रदान करण्यात आला.