
मुंबई गोवा महामार्गावर खेड येथे आराम बसची दुचाकीला धडक, स्वार गंभीर
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील पिरलोटेनजीक शुक्रवारी सकाळी 7.15 च्या सुमारास खासगी आराम बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. विनायक संदीप शिर्के (24 रा. खोपट- चिपळूण) असे गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
विनायक शिर्के दुचाकीने चिपळूण येथून लोटे येथे येत असताना एमआयडीसीतील एका कंपनीच्या खासगी आराम बसने दुचाकीला धडक दिली. अपघाताचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गिम्हवणेकर व सहकारी तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमीस मदतकार्य केले. अपघातप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.