
सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन ; दोघांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील कुर्धे आणि मेर्वी येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्या दोघांविरुद्ध पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलायमसिंग विरेंद्रसिंग (२८, मुळ रा. उत्तरप्रदेश सध्या रा.गावखडी,रत्नागिरी) आणि दिग्विजयसिंग रामहर्षसिंग (२४, मुळ रा.उत्तरप्रदेश सध्या रा.गावखडी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. ही घटना सोमवारी (ता. ९) सायंकाळी सहा ते आठ कालावधीत करण्यात आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्य प्राशन करत असताना सापडले. या प्रकरणी पोलिसांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.