
रत्नागिरी डी मार्ट समोर सीएनजीच्या टँकरमधील वायू गळती
रत्नागिरी : शहरातील टी आर पी येथे असलेल्या डी मार्ट समोरील रस्त्यावर शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास एका सी. एन. जी. टँकर मधून वायू गळती सुरू झाली. यानंतर अचानक मोठा स्फोट झाल्याने नागरीक भयभीत झाले. चालकाने लगेचच टँकर थांबवून सी. एन. जी. गॅस बाहेर काढण्यास सुरुवात केली. नागरिकांनी या घटनेची माहिती नगर परिषदेला कळवल्यानंतर अग्निशमन बंब घटणास्थळी दाखल झाला. सद्या आग विझविण्याचे काम सुरू आहे. मात्र या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.