
चंपक मैदान येथून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला बेड्या
रत्नागिरी
शहरालगतच्या चंपक मैदानाजवळच्या रस्त्यावर उभी करुन ठेवलेली दुचाकी चोरुन नेणाऱ्या संशयिताला ग्रामीण पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. असिम मुख्तार नाईक (वय २५, रा. नाईकनगर, पोमेंडी बुद्रुक, रत्नागिरी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३) रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महामद शाहीद वजीद अहमद पीरजादे यांनी दुचाकी चंपक मैदानाजवळच्या माहामार्गावर मंगळवारी पार्क करुन ठेवली होती. अर्ध्या तासाने ते तेथे आले असता दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी शोध घेतला असता दुचाकी सापडली नाही. या प्रकरणी पीरजादे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनिल चव्हाण करत होते. तपासात त्यांनी संशयितास अटक केली. नंबरप्लेट बदलून संशयित दुचाकी वापरत होता. संशयिताने दुचाकी (क्र. एमएच-०८ एव्ही ५६६८) बदलून (क्र.एमएच-०८ एझेड ७०७९) असा केला होता. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता ९ डिसेंबर पर्यंत संशयितास पोलिस कोठडी आदेश दिले आहेत.