
मद्य प्राशन करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील सांडेलावगण गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला झाडाखाली मद्य प्राशन करणाऱ्या संशयिताविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश आत्माराम माने (वय ५८, रा. कासारी गवाणवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ३) दुपारी दीडच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सांडेलावगण गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मद्य प्राशन करत असताना निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस शिपाई शिवम आंबुलकर यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरी, ता. ४ ः शहरानजीकच्या खेडशी-पुष्पेंद्र सिटी च्या गेट वरुन अज्ञात चोरट्याने दुचाकी पळविली. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २९ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हेमंत बिबिशन दराडे (वय ४९, रा. खेडशी पुष्पेंद्र सिटी महालक्ष्मी प्रेसेडन्सी सी व्हींग, रत्नागिरी) यांनी दुचाकी (क्र. एमएच-०८ एटी ४९५१) ही पुष्पेंद्र सिटीच्या गेट जवळ पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती पळविली. या प्रकरणी दराडे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.