
दोन मद्यपीविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील जांभारी फाटा, कोळीसरे येथे मद्य धुंद अवस्थेत सापडलेल्या दोघांविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलीप गणपत कुर्टे (४३) व प्रदिप नारायण बळकटे अशी संशयितांची नावे आहेत. या घटना सोमवारी (ता. २) दुपारी दीड व सायंकाळी सहा या कालावधित जांभारी फाटा व कोळीसरे रस्त्यावर निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित मद्य धुंद अवस्थेत रस्त्यावरुन जात असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस नाईक प्रसाद सोनावले यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा मद्यपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.