
रत्नागिरी पेठकिल्ला येथे आढळला भलामोठा अजगर
रत्नागिरी: शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका रशिदा गोदड यांच्या पेठकिल्ला येथील घराजवळ आलेल्या भल्या मोठा अजगर शिवसेनेच्या महिला नेत्या संध्या कोसुुंबकर यांनी पकडला. त्याचबरोबर शिवसेना नेते तथा माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या साळवी स्टॉप येथील पुष्पेद्र सिटीजवळील बंगल्याजवळ आलेला घोणस जातीचा साप मात्र सुटका करण्याआधी पळून गेला.
येथील माजी नगरसेविका रशिदा गोदड यांच्या घराजवळ भलामोठा अजगर दिसून आला. तेथील मुलांनी त्या अजगराची शेपटी पकडून त्याला सर्पमित्र संध्या कोसुंबकर येईपर्यंत अडवून ठेवले होते. सर्पमित्र संध्या कोसुंबकर यांनी हा अजगर पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
रत्नागिरीचे आमदार तथा माजी पालकमंत्री उदय सामंत यांचे साळवी स्टॉप येथील घराजवळ घोणस साप असल्याचे दिसून आले. सर्पमित्र असलेल्या संध्या कोसुंबकर त्या ठिकाणी साप पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच तो उडी मारून तेथीलच बिळात निघून गेला.