माहेर संस्थेतील वृद्धेचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः निवळी येथील माहेर संस्थेतील वृद्ध महिलेची तब्बेत ठिक नसल्याने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना तिचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चंदा विश्वनाथ पाटील (वय ७५, रा. निवळी माहेर संस्था, रत्नागिरी) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. २८) सकाळी सव्वादहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वयोवृद्ध चंदा पाटील यांची तब्बेत ठिक नसल्याने उपचारासाठी ५ नोव्हेंबरला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तिचा गुरुवारी मृत्यू झाला.