
भडगाव-खोंडेत तरुणाचा आकस्मिक मृत्यू
खेड : तालुक्यातील भडगाव-खोंडे कातवाडी येथील ४० वर्षीय तरुणाचा बुधवारी सकाळच्या सुमारास आकस्मिक मृत्यू झाला. मिलिंद बाळा मांडवकर असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाचा आवाज बंद होऊन त्याला घरघर लागली.
अंग पूर्णपणे गार पडून हालचालीही थांबल्या. मांडवकर यांना उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.