
कारवांचीवाडी रस्त्यासाठी रस्ता रोको व उपोषणाचा इशारा
रत्नागिरी : कारवांचीवाडी रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून त्या रस्त्यावर वाहने तर सोडाच चालणेही अशक्य बनले आहे. त्या रस्त्यावर जिवघेणे अपघात बारंवार होत आहेत.तेथील नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून
कोणतीही दखल घेण्यात आली नाही
याबाबतीत चौकशी करण्यासाठी तेथील रहिवाशी व भाजपा महिला मंडल अध्यक्षा सौ. प्रियल जोशी यांचे पुढाकाराने जिल्हा सरचिटणीस सतेज नलावडे, श्री. प्रमोद कांबळे सौ.बने मॅडम,ऋषिकेश केळकर, रसिक कदम यांनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात धडक मारली व त्याना हा रस्ता त्वरीत करणे संबंधी पत्र दिले व रस्ता 14 दिवसात
न झालेस रास्ता रोको/ उपोषण करण्याचा इशाय दिला. या रस्त्यासंदर्भात मा.मंत्री उदयजी सामंत साहेब व मा.आमदार भैय्या शेठ सामंत
यानी त्वरीत दखल घेतली व रस्ता 1 आवड्यात करण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या.