
बहिरवली फाट्यानजीक रिक्षाला अपघात
खेड : तालुक्यातील खाडीपट्टा मार्गावरील बहिरवली फाट्यानजीक रिक्षाला कारने धडक देवून अपघात केल्याप्रकरणी कारचालक रवींद्र आनंदा भांदिगरे यांच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रिक्षाचालक संतोष गायकवाड (४५) आपल्या ताब्यातील रिक्षातून ६ जणांना घेऊन सुसेरी नं. २ मार्गावरील दापोली-खेड बाजूने जात असताना खेडकडून वेगाने आलेल्या कारने रिक्षाला धडक दिली. यात एका महिलेच्या दुखापतीसह दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.