
दापोली-काळकाईकोंड येथे प्रौढाचा मृत्यू
दापोली:
दापोली शहरातील काळकाईकोंड येथे राहणारे लक्ष्मण सन्नू टांक या ५३ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लक्ष्मण टांग हे काळकाई कोंड येथे आपल्या घरी कपडे वाळत घालत होते. तेव्हा तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला दगडावर आपटल्याने गंभीर दुखापत झाली. यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना उपचाराकरिता दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून ते मृत असल्याचे जाहीर केले. याबाबत पोलीस स्थानकात अकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.