
मुंबईहून राजापुरात मतदानासाठी जाणाऱ्या लक्झरीला अपघात
मुंबई – गोवा महामार्गावर वांद्री येथील घटना
संगमेश्वर:
मुंबईहून राजापुरात मतदानासाठी जाणाऱ्या लक्झरीला नुकताच अपघात झाला. हा अपघात मुंबई – गोवा महामार्गावरील वांद्री येथे व्हॅगनार कारने लक्झरीला धडक दिल्याने झाला. या अपघातात कुणीही जखमी झाले नसले तरी वाहनांचे नुकसान झाले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील वांद्री बस स्टॉप जवळील प्राथमिक शाळेत आज मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. यावेळी सकाळी 8.30 वाजता लक्झरी मुंबईतून राजापूरला मतदान साठी मतदारांना घेऊन जात होती. याचवेळी रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने कार चालली होती. वांद्री येथील चढावात कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने लक्झरिला समोरून धडक दिली. यामध्ये लक्झरीचे दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर येथील ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली.