
रजिस्ट्रेशन, इन्शुरन्स नसलेली दुचाकी चालवणार्या वृध्दाविरोधात गुन्हा
रत्नागिरी: रजिस्ट्रेशन व इन्शुरन्स नसलेली दुचाकी वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करुन बेदरकारपणे चालवणार्या वृध्दाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 ऑक्टोबर दुपारी 11.45 वा. वाडेकरवाडी येथील इन्क्लेव अपार्टमेंट समोर घडली होती.
किशोर विठोबा चव्हाण (62, रा.कर्ला, स्वराज्यवाडी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकी चालक वृध्दाचे नाव आहे. त्यांच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल संतोष गायकवाड यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 27 ऑक्टोबर रोजी किशोर चव्हाण हे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एस-7157) हिचे रि रजिस्ट्रेशन व इन्शूरन्स नसताना दुचाकीच्या दोन्ही हॅन्डलला जिन्नसाच्या पिशव्या लावून वाहतुकीच्या नियामांकडे दुर्लक्ष करत जात होता. त्यावेळी हॅन्डलला लावलेल्या पिशव्या पुढील टायरमध्ये अडकल्यामुळे अपघात होउन त्यांना दुखापत होउन दुचाकीचेही नुकसान झाले होते. याप्रकरणी शुक्रवार 15 नाव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.