
संगमेश्वर धामणी येथे मच्छी टेम्पोला अपघात, चालक जखमी
संगमेश्वर:
मुंबई गोवा महामार्गावर धामणी येथे रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने मच्छी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला नुकताच अपघात झाला. या अपघातात टेम्पो चालक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.
सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने टेम्पो (KL 18AD76O4 ) हा 3 टन मच्छी घेऊन जात होता. महामार्गावरील संगमेश्वर धामणी येथे आला असता गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या दरम्यान चालकाला झोप अनावर झाल्याने टेम्पो रस्त्याच्या बाहे पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला आहे. अपघातात गाडीचे तसेच
मच्छीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने चालकाला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती संगमेश्वर पोलिसांना देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहे.