
वनगुळे येथील डेटॉल प्राशन केलेल्या प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी ः वनगुळे (ता. लांजा) येथील प्रौढाने डेटॉल प्राशन केले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. महेश जयराम गुरव (वय ४५, रा. वनगुळे, ता. लांजा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ९) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी महेश गुरव याने कोणत्यातरी अज्ञात कारणातून डेटॉल प्राशन केले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.