
विषारी औषध प्यायल्याने महिलेचा मृत्यू
खेड :तालुक्यातील महिलेने नजरचुकीने गवतनाशक प्यायल्याने मृत्यू झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता घडली. मृत महिला ( पोलिसांनी नाव जाहीर केलेले नाही ) २३ वर्षे वयाची होती. ती साखर गावातील रहिवासी होती.
दिनांक २८ ऑक्टोबर रात्री १०.३० वाजता तिने चुकून खोकल्याचे औषध समजून गवतनाशक विष प्यायले होते. तिला तत्काळ उपचारासाठी चिपळूण, डेरवण, मुंबईतील के. एम. हॉस्पिटल, जे. जे. हॉस्पिटल आणि शेवटी पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.