
आपचे जिल्हाध्यक्ष साळवींचा राजीनामा
रत्नागिरी: आम आदमी पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष परेश साळवी यांनी पदाचा राजीनामा दिला.
निवडणूका न लढता महाविकास आघाडीत सामिल झाल्याच्या नाराजीतून त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वचाही राजीनामा दिला आहे. त्यांनी गुरूवारी आपल्या पदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आम आदमी पक्षाने राज्यात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेऊन महाविकास आघाडीत सामील होण्याचे वरिष्ठांचे आदेश नाकारत साळवी यांनी नाराज होऊन हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले.