
संगमेश्वर गोळवलीतील गरम पाण्याचे कुंड, पुरातन अवशेष भग्नावस्थेत
संगमेश्वर : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली या ठिकाणचे गरम पाण्याचे कुंड आणि पुरातन अवशेष भग्नावस्थेत असून पर्यटन दृष्ट्या विकसित करणे गरजेचे आहे.
गोळवली या ठिकाणी गरम पाण्याचे कुंडे आहे, मात्र गेली अनेक वर्ष ते भग्नावस्थेत आहे. या ठिकाणी असलेल्या लिखित स्वरूपाच्या माहितीनुसार गरम पाण्याचे कुंड राजवाडी येथील पालखीच्या शिलकेतून जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे मात्र त्यानंतर या ठिकाणचा पर्यटन दृष्ट्या विकास करण्यात आलेल्या नसल्याने पर्यटक या ठिकाणी कमी संख्येने येतात तसेच या ठिकाणची पुरातन मंदिरे आणि त्या ठिकाणी असलेले पुरातन अवशेष दगडामध्ये कोरलेले पुरातन ठेवा जतन करून ठेवणे आवश्यक होते मात्र दिवसेंदिवस तो नष्ट होत चाललेला आहे. त्यामुळे हे पुरातन अवशेष जतन करण्याची मागणी करण्यात येत आहे तसेच या कुंडाला पर्यटन दृष्ट्या विकसित करण्याची मागणी करण्यात येत आहे.