
दापोली गुहागर आळी येथे अवैध दारू बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा
दापोली : दापोली गुहागर आळी येथे अवैद्य दारूसाठा बाळगल्याप्रकरणी समीर सुबोध गुहागरकर (40, रा. आडे) याच्यावर 31 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास समीर गुहागरकर हा आडे गुहागर आळी समुद्रकिनारी झाडी झुडपाच्या आडोशाला आढळून आला. त्याच्या ताब्यात सुमारे 9 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. अवैधरित्या दारूसाठा बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (इ) नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत