सर्वसाधारण निरीक्षक जनक प्रसाद पाठक यांची 266- रत्नागिरी निवडणूक निर्णय अधिकारी कक्षाला भेट
रत्नागिरी : सर्वसाधारण निरीक्षक जनक प्रसाद पाठक यांनी 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कक्षाला आज भेट दिली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.*
नामनिर्देशन पत्र दाखल होण्याची प्रक्रीया त्यांनी यावेळी पाहिली. तहसिलदार राजाराम म्हात्रे यावेळी उपस्थित होते.