चिपळूण-संगमेश्वर मध्ये गाव विकास समितीचे दोन्ही अर्ज वैध
अनघा कांगणे यांचा अर्ज कायम ठेवून ऍड.सुनील खंडागळे घेणार माघार
रत्नागिरी : गाव विकास समितीच्या वतीने चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते.सौ.अनघा कांगणे व एडवोकेट सुनील खंडागळे या दोघांचे अर्ज वैध ठरले असून अनघा कांगणे यांचा अर्ज कायम ठेवून ऍड.सुनील खंडागळे अर्ज मागे घेणार असल्याची माहिती गाव विकास समितीच्या महिला संघटना अध्यक्ष सौदीक्षा खंडागळे गीते यांनी दिली.
चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात गाव विकास समिती अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे.गाव विकास समितीने या आधीच महिला उमेदवार जाहीर केला आहे, मात्र एडवोकेट सुनील खंडागळे यांनी डमी अर्ज दाखल केला होता.दोघांचेही अर्ज वैध ठरले आहेत. चार तारखेला एडवोकेट सुनील खंडागळे अर्ज मागे घेणार असून सौ अनघा राजेश कांगणे या गाव विकास समितीच्या अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात राहणार आहेत. चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघात कॅशलेस हॉस्पिटल,रोजगारासाठी तालुका निहाय एमआयडीसी विकास, शेती विकास- पायाभूत सुविधा व ग्रामीण भागातील शाळांचा शैक्षणिक दर्जा या चार गॅरंटी गाव विकास समितीच्या वतीने चिपळूण संगमेश्वर मधील मतदारांना देण्यात आल्या असून या निवडणुकीत गाव विकास समितीचा उमेदवार विजयी झाल्यास ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे व अध्यक्ष उदय गोताड यांच्या नेतृत्वाखाली गावांच्या भविष्यासाठी ही निवडणूक लढवली जात असल्याचे महिला अध्यक्षा दिक्षा खंडागळे-गीते यांनी सांगितले.