रत्नागिरी झाडगाव येथे मंत्री उदय सामंत यांचा फटाक्यांच्या स्टॉलला दीली भेट
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्साह
रत्नागिरी, : आज रत्नागिरी तालुक्यातील झाडगाव येथे मंत्री उदय सामंत यांनी फटाक्यांच्या स्टॉलला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वतःहून रॉकेट लावून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित नागरिकांनी त्यांना फटाक्यांची माळ भेट देत 23 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा आमदार निवडणुकीत त्यांना विजयी रॅलीत ही फटाक्यांची माळ लावण्याची इच्छा व्यक्त केली.

मंत्री उदय सामंत यांनी नागरिकांच्या या उत्साहाचे स्वागत केले आणि त्यांना आश्वासन दिले की, ते रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहतील. त्यांनी नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे रत्नागिरी तालुक्यात महायुतीच्या पदाधिकारी, करायकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.
