
रत्नागिरी शहरातिल युवा सुहेल अनिस मालवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसमवेत केला प्रवेश
सुहेल अनिस मालवणकर याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या युवा शहर संघटकपदी झाली नियुक्ती..
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील युवा नेतृत्व सुहेल अनिस मालवणकर यांनी तालुकाध्यक्ष श्री. राजनजी सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कोकणनगर, क्रांतीनगर, बाजारपेठ मधील अनेक युवा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणा-या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. तालुकाध्यक्ष श्री. राजनजी सुर्वे आणि शहराध्यक्ष श्री. निलेशजी भोसले यांनी सुहेल अनिस मालवणकर याचा पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये प्रवेश करून घेतला. शहराध्यक्ष श्री. निलेशजी भोसले यांनी सुहेल अनिस मालवणकर याची युवा शहर संघटक म्हणून नियुक्ती केली आणि पक्ष संघटन वाढीसाठी कार्यरत राहण्यास सांगितले. तालुकाध्यक्ष श्री. राजनजी सुर्वे यांनी सुहेल अनिस मालवणकर याची युवा शहर संघटक म्हणून नियुक्ती झाल्यामुळे त्याचे अभिनंदन केले आणि लवकरच त्याच्या नेतृत्वाखाली शहरातील अनेक युवा पक्षामध्ये प्रवेश करतील याची खात्री दिली. महाविकास आघाडीचे विधानसभेचे उमेदवार श्री. बाळासाहेब माने यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्यासाठी तालुकाध्यक्ष श्री. राजनजी सुर्वे आणि शहराध्यक्ष श्री. निलेशजी भोसले यांनी आवाहन केले त्यावेळी जेष्ठ माजी नगरसेवक श्री. बबन आंबेकर, जेष्ठ नेते श्री. दरबारभाई वाडकर, श्री. सुकेश शिवलकर उपस्थीत होते.
▪️युवा साहील अनिस मालवणकर यांनी युवा शहर संघटकपदी नेमणूक केल्याबद्दल आभार मानले आणि येणा-या २-४ दिवसामध्ये शहरातील अनेक युवा कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याची ग्वाही दिली. होत असलेल्या विधानसभा निवडणूकीमध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. बाळासाहेब माने यांना निवडून आणण्यासाठी जोमाने कामाला लागणार असल्याचे शहर युवा संघटक सुहेल अनिस मालवणकर यांनी सांगितले. सुहेल अनिस मालवणकर याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये प्रवेश करतेवेळी युवा कार्यकर्त्यांबरोबर शहरातील अनेक सामाजिक प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रवेश केला त्यामध्ये फरदीन सोलकर, ताशिफ गडकरी, श्री. सचिन वायंगणकर, श्री. सुभाष किड्ये, श्री. सुबान शेख, श्री. आझाद शेख, तॊबीन रीफाई, सलमान शेख, रियाज शेख, नवाज शेख, आमिन रिफाई, अल्ताफ शेख, युसुफ रिफाई, रिहाब रिफाई, रिझवान रिफाई, शकिल शेख, आयुब शेख, वाहीद सोलकर आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला असल्याचे तालुकाध्यक्ष राजन सुर्वे यांनी सांगितले.