उबाटा शिवसेनेला मोठा धक्का परशुराम कदम यांचा शिवसेना पक्षात प्रवेश
रत्नागिरी : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात मोठे राजकीय घडामोडी सुरू असून एक मोठी बातमी आली आहे ,अनेक दिवसापासून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परशुराम कदम हे शिवसेना शिंदे गटाकडे जाणार अशी चर्चा सुरू होती. त्याचा मुहूर्त सापडला आणि उभाठा गटाचे नेते हातखंबा जिल्हा परिषद गटातील कणखर व्यक्तिमत्व परशुराम कदम यांनी शिवसेना (शिंदे गट)पक्षात सहकारी कार्यकर्त्यांसह प्रवेश केला आहे , रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि विद्यमान उमेदवार उदय सामंत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश कार्यक्रम पार पडला.
रत्नागिरीच्या राजकीय घडामोडीतील मोठी बातमी, उबाठा गटाला मोठा धक्का, प्रवेश कार्यक्रम सुरूच, कार्यकर्त्यांची अदलाबदल, तरुण कार्यकर्त्यांची शोधाशोध ग्रामीण भागात सर्वत्र सुरू आहे.