
मनीषा बेडगे यांना ‘क्रीडा रत्न’ पुरस्कार
रत्नागिरी : राष्ट्रीय जलतरणपटू व ’क्रीडा संघटक 2015’ म्हणून शासकीय क्रीडा पुरस्कार प्राप्त तसेच मराठा मंदिर ग्लोबल स्कूलमध्ये (सीबीएसई) जलतरण क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या मनीषा संजय बेडगे यांना क्रीडा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आल़े. कोल्हापूरच्या आविष्कार फाऊंडेशन, इंडिया यांच्यामार्फत दिला जाणारा सन 2024 चा राज्यस्तरीय क्रीडा रत्न पुरस्कार कोल्हापूर येथे प्रदान करण्यात आला.
ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत किसनराव कुऱ्हाडे, ज्येष्ठ पत्रकार ताज मुलाणी, सुरेश उगरे व शिवाजी कोरवी, दत्तात्रय सूर्यवंशी, रंगराव सूर्यवंशी, माधुरी सावंत, भोसले आणि संजय पवार आदी मान्यवरांच्या हस्ते मनीषा बेडगे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आल़ा. यावेळी त्यांचे पती संजय बेडगे, मुलगे, सासू सासरे व संपूर्ण बेडगे परिवार उपस्थित होता.
मराठा मंदिर ग्लोबल स्कूल प्रिन्सिपॉल, प्रशासन अधिकारी- कर्मचारी व समाजातील प्रतिष्ठीत वर्गातून कौतुक करण्यात येत आहे.