
भाट्ये येथे दारु विक्रीवर पोलिसांची धाड
रत्नागिरी ः शहरानजीकच्या भाट्ये जोयनाकवाडी येथे विनापरवाना दारु विक्री करणाऱ्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर भार्गव भाटकर (वय ४७, रा. भाट्ये जोयनाकवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २१) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जोयनाकवाडी येथील रस्त्याच्या बाजूला झाडी झुडपाच्या आडोशाला निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा विनापरवाना हातभट्टीची ५२० रुपयांची पाच लिटर दारु विक्रीच्या उद्देशाने स्वतःकडे बाळगलेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास जाधव यांनी शहर पोलिस पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.