
‘संपर्कक्रांती’ मधून महिलेचा मोबाईल लंपास
खेड: कोकण मार्गावरील संपर्कक्रांती एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवासी महिलेचा ३० हजार रूपये किंमतीचा मोबाईल चोरट्याने लंपास केल्याची तक्रार येथील पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ही घटना १३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास येथील रेल्वेस्थानकावर घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी महिला प्रवासी संपर्कक्रांती- सुपरफास्ट एक्स्प्रेसने उडुपी रेल्वेस्थानकातून प्रवासाला निघाल्या होत्या. त्यांच्याकडील मोबाईलवर ठेवून त्या झोपल्या होत्या. झोपल्या असल्याची संधी साधत चोरट्याने मोबाईल लंपास केला. एक्स्प्रेस सकाळी ६ च्या सुमारास येथील स्थानकात आली असता मोबाईल चोरीस गेल्याचे लक्षात. आले. रेल्वेगाड्यातून प्रवाशांचे मोबाईल लंपास करण्याचे प्रकार वाढले आहेत.