
सवेणीमध्ये ३५ लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त
खेड : येथील पोलिसांनी गुरुवारी सवेणी शिंदेवाडी येथे गावठी दारू धंद्यावर टाकलेल्या धाडीत ३,५०० रुपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली. या प्रकरणी एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामचंद्र कृष्णा शिंदे (वय – ४९ वर्षे, रा. सवेणी शिंदेवाडी, ता. खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. गैरकायदा विना परवाना गावठी हातभट्टीची दारू स्वतःच्या ताब्यात ठेवल्याचे आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.