
चिपळुणात वाहतुकीस अडथळा, दोघांवर कारवाई
चिपळूण : शहरातील चिंचनाका व बहादूरशेखनाका येथे चूकीच्या पद्धतीने वाहने उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
संदीप सिताराम सुर्वे (४१, आकले-गुरववाडी), कृष्णा रामचंद्र जाधव (५४, निवे-खेड) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. सुर्वे याने आपल्या ताब्यातील टाटा मॅजिक गाडी चिंचनाका येथे, तर जाधव याने ” मारुती इको गाडी बहादूरशेखनाका येथे उभी करून ठेवली होती. यामुळे – वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याने वाहतूक पोलीस है. कॉ. अशोक पवार व गणेश नाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार या दोघांवर कारवाई करण्यात आली.