
हातभट्टी दारु विक्री ; संशयिताविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील वरवडे-बौद्धवाडी येथे पोलिसांनी गावठी हातभट्टी दारु विक्रीवर कारवाई केली. संशयिताविरुद्ध जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुलदीप अनंत जाधव (वय ३६, रा. वरवडे-बौद्धवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १६) दुपारी एकच्या सुमारास वरवडे-बौद्धवाडी येथील जंगलमय भागात निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने विनापरवाना हातभट्टीची साहित्यासह ५२५ रुपयांची पाच लिटर दारु विक्रीसाठी बाळगली असताना सापडला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल कुलदीप दाभाडे यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.