
जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिना निमित्त अंध दिव्यांगांनी व्यक्त केल्या मदतीच्या अपेक्षा
रत्नागिरी : 15 ऑक्टोबर 2024 रोजी आस्था सोशल फाउंडेशन रत्नागिरीच्या वतीने परकार हॉस्पिटल समोरील कार्यालयात जागतिक अंध काठी सुरक्षा दिना निमित्त बँकेत कार्य करणाऱ्या अंध दिव्यांग मयुरी जोशी, सचिन जोशी व क्षीण दृष्टी दिव्यांग साक्षी नाटेकर, संतोष नाटेकर दांपत्याशी सुरेखा पाथरे यांनी संवाद साधला. याप्रसंगी आम्ही अंध असूनही सामान्य जीवन जगू शकतो परंतु आधी पालकांनी स्वीकारायला हवे, सक्षम रीतीने शिक्षण घेऊ शकतो परंतु सर्व शिक्षकांना सर्व दिव्यांगांना कसे शिकवावे यांचे प्राथमिक शिक्षण देणे आवश्यक आहे. आम्ही नोकरीत देखील आम्हाला दिलेले काम प्रामाणिक पणे पुर्ण करतो.* *आजच्या पांढरी काठी सुरक्षा दिनाच्या निमित्ताने आमची समाजाकडून अपेक्षा आहे की पांढरी काठी घेऊन जर आपणाला रस्त्यावर जर एखादी व्यक्ती दिसली व त्यांनी मदत मागितली तर त्यांना मदत करा.* *रस्त्याच्या बाजूने फुटपाथ नाही. त्यामुळे डोळस व्यक्तींनाच इतकं असुरक्षित वाटतं तर आमची काय अवस्था होत असेल?
याचा शासनाने विचार करायला हवा. या दिनाच्या निमित्ताने*
👩🦯🧑🏻🦯 *”चला आज संकल्प करूया, पांढरी काठी घेऊन चालणाऱ्यांची मदत करूया”*