
ओणीमध्ये २३ वर्षीय विवाहितेची आत्महत्या
दापोली:- तालुक्यातील ओणी पारधीवाडी येथेअमृता महेंद्र पड्याळ या २३ वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी २.३० ते संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमृता पडाळने राहत्या घराच्या हॉलमध्ये लोखंडी बीमला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. अमृता पड्याळच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी दापोली पोलीस स्थानकात अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.