
भोस्ते घाटातील चोरीप्रकरणी दोघांची जामिनावर सुटका
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटातील एका ट्रकमधून ७० हजार रुपये किंमतीच्या साहित्यासह ४ महिन्यापूर्वी जिओ मोबाईल टॉवरचे साहित्य चोरल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या ‘त्या’ दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्या दोघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली.
शंकर सुरेश बुरटे (३८, रा. चिपळूण-खंड-कांगणेवाडी), इब्राहिम सलीम पटाईत (२२, रा. गोवळकोट रोड-चिपळूण) या दोघांना ट्रकमधून साहित्य चोरल्याप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केली होती. २१ जून २०२४ रोजी बोरज येथील जिओ मोबाईल टॉवर चोरीप्रकरणातही त्यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.