
‘त्या’ वाहकाला न्यायालयीन कोठडी
दापोली : महाविद्यालयीन युवतीची बसमध्ये छेड काढणाऱ्या माजिद तांबोळी या वाहकाची न्यायालयीन कोठडीत परवानगी करण्यात आली आहे.
तालुक्यातील कोळथरे-दापोली या मार्गावर दोन दिवसांपूर्वी बसमध्ये हा प्रकार घडला होता. यानंतर गाडीतील युवतींनी व ग्रामस्थांनी वाहकाला चोप दिला होता. याबाबत दाभोळ सागरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयिताला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.