
बोरघरातील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
खेड : तालुक्यातील बोरघर नवीन वसाहत येथे वास्तव्यास असलेल्या ६२ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विजय धोंडू धोत्रे असे मृत वृद्धाचे नाव आहे. ते राहत्या घरात पडल्याने उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी डेरवण रूग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या बाबत येथील पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.