
आपल्यासह इतर सजीवांचे संरक्षण गरजेचे : के.डी. कांबळे शिर्के प्रशालेत वन्यजीव सप्ताह साजरा
रत्नागिरी : शहरातील रा.भा. शिर्के प्रशाला येथे निसर्ग सोबती संघटनेतर्फे वन्यजीव सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रबोधनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .
दि. ७ आक्टोबर रोजी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री के. डी. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमात निसर्गसोबती संघटनेचे विराज आठल्ये व निकीता शिंदे यांनी विद्यार्थ्यांना जैवविविधतेची माहिती दिली. यावेळी त्यांनी पीपीटी सादरीकरण करून जैव विविधतेचे महत्व विशद केले. देशभरातील तसेच कोकणातील विशेष असे विविध पशू , पक्षी , फुलपाखरे आदींविषयी त्यांनी सखोल माहिती दिली. तसेच त्यांचे संरक्षण करणे का आवश्यक आहे हे पटवून दिले.
प्राणी ,पक्षी , किटक आपले खरे निसर्ग सोबती असल्याचे मत मुख्याध्यापक श्री. के. डी. कांबळे यांनी यावेळी व्यक्त केले. मानवाने आपल्या सोबतच निसर्गातील सोबत्यांची पण काळजी घेतली पाहिजे असे प्रतिपादन प्रशालेचे स्काऊट शिक्षक प्रशांत जाधव यावेळी केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी स्काऊट गाईडस यांनी मेहनत घेतली. यावेळी हरीत सेनेचे श्री ए पी चव्हाण , श्री एस एस पडवेकर , मंगेश जाधव , श्री पांढरे , श्री कुवर , श्री मुंडेकर सौ धामापूरकर गाईड कॅप्टन सौ टी जे यादव आदी शिक्षक तसेच सिद्धार्थ भोरे श्री अलीम आदी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.