
वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचा विरोध करीत पालकमंत्र्यांना दाखवले काले झेंडे
रत्नागिरी : आज रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे उद्घाटनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उद्घाटन कार्यक्रमाला सकल हिंदू समाजाचा व भाजपतर्फे तीव्र विरोध केला गेला,यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. या कार्यक्रमादरम्यान हिंदुत्ववादी संघटनांचा पालकमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून विरोध केला.जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. निषेध व्यक्त करण्यात आला, कार्यकर्ते आक्रमक झाले होते.जय श्रीरामचा नारा देत हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला , काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. असे असले तरी पालक मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज वक्फ बोर्डाच्या कार्यालयाचे रत्नागिरी येथे थाटात उद्घाटन करण्यात आले.