
पत्रकार शेखर कुमार भुते यांचे निधन
रत्नागिरी : रत्नागिरीतील पत्रकार व रंगयात्री साप्ताहिकाचे संपादक शेखर कुमार भुते (६७) यांचे रविवारी सकाळी ११.४५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. रत्नागिरीतील परकार रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
रत्नागिरीतील पत्रकार क्षेत्रामध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी निर्भिडपणाने लेखन करणे, अशी शेखर कुमार भुते यांची ख्याती होती. मी रत्नागिरीकर या संघटनेमार्फत अडीअडचणीत सापडलेल्यांना सातत्याने त्यांनी लढा देण्याचे काम केले. त्यांच्या निर्भिड पत्रकारितेमुळे अनेकांना न्याय मिळाला होता. त्रैमासिक निसर्ग, साप्ताहिक रंगयात्रीमधून त्यांनी आपले स्पष्टपणे विचार मांडले होते.
काही काळ दैनिक कोकण गर्जनामधूनही त्यांनी लेखन केले. त्यांच्या निधनाने येथील ज्वलंत पत्रकारिता हरवल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली.