
गावठी दारुची वहातूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा
रत्नागिरी ः देवधे फाटा (ता. लांजा) येथे विनापरवाना हातभट्टी दारुची वाहतूक करणाऱ्या संशयित तीन जणांविरुद्ध लांजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनाकडून साहित्यासह २ लाख ५० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरीतील दोन संशयितांचा समावेश आहे.
गौरव नंदकुमार चव्हाण (३७, रा. मिरजोळे, जांभुळफाटा, रत्नागिरी), शिवजित सुनिल पाटील (रा. मिरजोळे, पाटीलवाडी) आणि बाळकृष्ण वामनसे (रा. झापडे, ता. लांजा) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना शनिवारी (ता. ५) सव्वासातच्या सुमारास देवधे फाटा येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांनी एक मेकांशी संगनमत करुन विनापरवाना गावठी हातभट्टी दारुची वाहतूक करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यांच्याकडून २ लाख ३० हजाराची मोटार (क्र. एमएच-०१ एव्ही ६३४९), २० हजार ३५० रुपयांची २०० लिटर गावठी हातभट्टी दारु पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.