
रत्नागिरीतील शिवसेनेचा कट्टर कार्यकर्ता जयसिंग उर्फ आबा घोसाळे आपल्या कार्यकर्त्यांसाह शिंदे च्या शिवसेनेत दाखल
रत्नागिरी : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी आज पालकमंत्री उदय सामंत याच्या उपस्थिती मध्ये आज उबाठा शिवसेनेला सोडून शिवसेनेत दाखल झाले.
याबाबत बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की आबा घोसाळे हे कट्टर शिवसैनिक आहेत शिवसेनेची पहिली ग्रामपंचायत त्यानी आणली. ते जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले होते असे ही पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
तर पक्ष पक्षप्रवेशानंतर जयसिंग घोसाळे म्हणाले की आता पालकमंत्री तथा उदय सामंत यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करणार आणि तालुक्यात त्यांना प्रचंड मताने निवडून आणणार असल्याचेही जयसिंग उर्फ आबा घोसाळे यांनी जाहीर केले आहे.