
सामाजिक जाणीवतून कांचन मालगुंडकर यांनी आशादीप संस्थेत साजरा केला वाढदिवस!
रत्नागिरी – रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटोग्राफर कांचन मालगुंडकर यांनी आपला वाढदिवस गतिमंदांची सेवासुसृषा करणाऱ्या आशादीप संस्थेमध्ये साजरा केला. संस्थेतील गतिमंदांच्या सहवासात वाढदिवसाचा केक कापून त्यांच्यासोबतचे आनंदाचे क्षण आपण कधीही विसरणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
कांचन मालगुंडकर हे सामाजिक जाणीव असलेले फोटोग्राफर आहेत. या सामाजिक जाणीवेतून ते विविध सामाजिक उपक्रम नेहमीच राबवित असतात. आपल्या कुटुंबातील सदस्यांचे वाढदिवस ते सामाजिक उपक्रमाद्वारे साजरा करतात. वाढदिवसासाठी होणारा खर्च ते सामाजिक संस्था किंवा सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींसह शेअर करतात. यानुसार त्यांनी स्वतःचा वाढदिवसही अशादीप या संस्थेत साजरा केला. यावेळी त्यांनी संस्थेतील गतिमंदांशी प्रेमाने वागत त्यांना विविध भेटवस्तू व खाऊंचे वाटप केले
.
यावेळी त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. त्यांच्या पत्नी सौ. मधुरा कन्या श्रावणी, सुपुत्र मंथन, तसेच मित्र शकील गवाणकर व संस्थेचे संचालक दिलीप रेडकर उपस्थित होते.