
वाटद-खंडाळा येथे पोटदुखीने प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी:- कंन्स्ट्रक्शनचे काम करत असताना अचानक पोट दुखू लागलेल्या तेलंगणा येथील प्रौढाला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. इपल्लापल्ली लक्ष्मण (वय ४७, रा. नेराल्ला पल्ली, मंडल, थिमाजीपेट, जिल्हा नागर करनुल, राज्य तेलंगणा) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २) सायंकाळी सातच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार इपल्लापल्ली यांच्या कामावर असताना अचानक पोटात दुखू लागले. खबर देणार यांनी तात्काळ तेथील कामगार बगच्या मदतीने दुचाकीवरुन त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. जयगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.