
चाफेरी येथे कामगाराचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी: तालुक्यातील चाफेरी येथील कामगाराच्या पोटात अचानकपणे दुखून मृत्यू झाला. ही घटना बुधवार 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वा. सुमारास घडली.
इपल्लापल्ली लक्ष्मण (47, मुळ रा. नागर करनुल, तेलंगणा) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तो चाफेरी येथील इंडियन ऑईल पेट्रोलपंपा मागे जे. जे. कन्स्ट्रक्शनच्या मार्फत आर्टिफिशील रिफ्स करण्याचे काम करत होता. बुधवारी सायंकाळी 5 वा. सुमारास अचानकपणे त्याच्या पोटात दुखु लागल्याने त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.