
वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या दाम्पत्याच्या 24 तासात मुसक्या आवळल्या
सिंधुदुर्गातून मुद्देमालासह घेतले ताब्यात
रत्नागिरी : शहरातील लता टॉकीज जवळ घरात एकट्याच असलेल्या वृद्ध महिलेला मारहाण करून तिच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या दाम्पत्याच्या सावंतवाडी येथून पोलिसांनी मुसक्या आवळल्या. शेखर रमेश तळवडेकर, ( 47 वर्षे), सौ. आश्लेषा शेखर तळवडेकर (48 वर्षे दोन्ही रा. ओम शांती प्लाझा, लक्ष्मी चौक, गाडीतळ रत्नागिरी मूळ रा. तळवडे ता. सावंतवाडी जिल्हा सिंधुदूर्ग) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
28 सप्टेंबर रोजी सकाळी 8.35 वाजता घरामधील एकटयाच असलेल्या वृढेला मारहाण व दुखापत करुन तिचे हातामधील दोन सोन्याच्या बांगडया व गळयामधील सोन्याची चैन जबरदस्तीने खेचून जबरी चोरी केली होती. त्याबाबत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री गायकवाड यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस सुचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तात्काळ नियुक्त करुन गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकाने गोपनीय बातमीदाराद्वारे मिळालेल्या माहीतीवरुन हा गुन्हा शेखर रमेश तळवडेकर याने त्याची पत्नी आश्लेषा शेखर शेखर रमेश तळवडेकर हीचे मदतीने केलेला असल्याचे निष्पन्न झाले. गोपनीय माहीतीचे आधारे दोघांना सिंधुदूर्ग येथून 24 तासांचे आतमध्ये ताब्यात घेण्यात आले. त्यांचेकडून गुन्हयात जबरी चोरी केलेले एकूण 1,64,000/- रुपये किमंतीचे सोन्याचे दागिने (100% मुद्देमाल जप्त करण्यात आलेले आहेत. गुन्हयाचा पुढील तपास रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यामार्फत सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील सपोनि /श्री.तानाजी पवार, पोहेकॉ / विजय आंबेकर, पोहेकॉ /दिपराज पाटील, पोहेकॉ योगेश नार्वेकर, पोहेकॉ / विवेक रसाळ, मपोहेका / वैदेही कदम, पोना / दत्तात्रय कांबळे यांनी कामगिरी केली.