
एसटी अपघातप्रकरणी चालकावर गुन्हा
चिपळूण : पेढांबे-भराडे बसथांबा परिसरात बुधवारी झालेल्या एसटी अपघातप्रकरणी बसचालक रामू अभिमान येताळ (३६, चिपळूण आगार) याच्यावर गुन्हा दाखल झाला. येताळ हा बस पोफळीकडून चिपळूणकडे घेऊन येताना वरील ठिकाणी त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ही एसटी रस्त्यालगत खडीच्या ढिगाऱ्यावर आदळली. त्यात प्राजक्ता डेरवणकर, विश्वास डेरवणकर हे प्रवासी जखमी झाले. त्यामुळे अपघातास कारणीभूत असलेल्या येताळवर गुन्हा दाखल झाला असून याचा अधिक तपास अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे सहा. पो. नि. भरत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.