
जागेत गुरे चरवण्यास नेल्याने केली मारहाण
चिपळूण : तालुक्यातील धामणवणे- शिगवणवाडी येथे एका जागेत गुरे चरवण्यासाठी नेल्याने याच रागातून एकाने त्या गुराख्यास मारहाण केल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली. याप्रकरणी मारहाण करणाऱ्यावर चिपळूण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन शिवराम शिगवण (धामणवणे-शिगवणवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची वसंत गोपाळ उदेग (६५, धामणवणे-शिगवणवाडी) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २० रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वसंत उदेग हे धामणवणे- शिगवणवाडी येथे एका ठिकाणी गुरे चरवण्यासाठी गेले होते. गुरे चरविण्यासाठी गेलेले ठिकाण चेतन शिगवण याच्याच मालकीचे असल्याचे मानून तो वाडीतील सर्व लोकांना त्याठिकाणी कोणीही गुरे चरविण्यासाठी जाऊ नका असे सांगत असतो. असे असताना त्याठिकाणी वसंत उदेग हे त्याठिकाणी गुरे चरविण्यासाठी गेले असता याचा राग मनात धरुन शिगवण याने उदेग यांच्या हातातील काठी हिसाकावून त्याना मारहाण केली. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.